728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अहमदनगर शहराचे वर्तमान-भविष्य अवघड - शाह फैसल


अहमदनगर । DNA Live24 - शहराच्या तिन्ही बाजूने लष्करी केंद्र असल्याने वाढीला आणि विकासाला भौगोलिक मर्यादा प्रचंड आहेत. स्थानिक पातळीवर नेतृत्वाची अनास्था आणि दुरदृष्टीचा अभाव, हा रोग तर गेली 30-40 वर्षे अहमदनगरला लागलेला आहे. विकास करण्याची गरज नसते; विकास आपोआप होत असतो. चांगले रस्ते म्हणजे विकास नसतो, अशी मुक्ताफळे उधळणारी माणसे आपण निवडून देतो. ज्यामुळे अहमदनगर शहराचे वर्तमान व भविष्य अवघड आहे, असे प्रतिपादन टिपू सुलतान सेनेचे अध्यक्ष शाह फैसल यांनी केले.

अहमदनगर शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त बागरोजा येथे अहमद निजाम शाह यांच्या कबरीवर अहमदनगर सोशल क्लब व टिपू सुलतान सेनेच्या वतीने चादर अर्पण करण्यात आली. यावेळी अहमदनगर सोशल क्लबचे अध्यक्ष नईम सरदार, उबेद शेख, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे आदि उपस्थित होते.

यावेळी शाह फैसल म्हणाले, आधी नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका, सत्ताधारी म्हणजे सोयरे पक्ष, सत्ताधारी कोणीही असले तरी ठेकेदार तेच असलं चित्र. चाँदबिबी घोड्यावर बसून पुन्हा आली तरी शहरातील रस्ते चुकणार नाही हा विनोद आम्ही निर्लज्जपणे सांगतो यातच सगळं आलं, असे सांगितले. 

नईम सरदार यांनी सांगितले की, नियम पाळणे हा नगरकरांचा दुरान्वये संबंध नाही, त्यामुळे अपघात, वाहतुक कोंडी, बेशिस्त वाहतूक आणि मरणारी माणसं याचीही लाज वाटते. या उदानसिनतेचा परिपाक म्हणून अहमदनगरची एमआयडीसी सुरुवातीपासून कुपोषित आहे.

जुने उद्योग बंद पडले, नवे उद्योग येत नाही, आणि आले तरी राजकीय दबावाला कंटाळून पळून जातात. रोजगार निर्मिती नाही. पर्यायाने बाजारपेठ मर्यादे पलिकडे वाढत नाही. या दुष्टचक्रात अहमदनगर शहर अडकले असल्याचे नमुद केले. याप्रसंगी शहरातील इतिहासप्रेमी व शहरावर प्रेम करणार्‍या नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अहमदनगर शहराचे वर्तमान-भविष्य अवघड - शाह फैसल Rating: 5 Reviewed By: DNA Live24