Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, १८ मे, २०१७

प्रेस क्लबतर्फे अनामप्रेमच्या गौरांग शाळेस मदत


अहमदनगर । DNA Live24 - आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचा पत्रकारितेसह सामाजिक उत्तरदायित्वाचा वारसा जपत प्रेस क्लबने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनामप्रेम संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या गौरांग शाळेस आर्थिक मदत देवून आपली वेगळी ओळख जपली. 

गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेत जांभेकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख व मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मिनाताई मुनोत यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.

प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार महेश देशपांडे, भुषण देशमुख, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, राधाताई कुलकर्णी, नरेंद्र बोठे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत,  अनुजा कुलकर्णी, धनराज गांधी, अजित माने, अर्चना लिंबोरे, अन्सार सय्यद, सचिन कलमदाने, संदीप दिवटे, वाजिद शेख, सचिन शिंदे, अमीर सय्यद, राजू खरपुडे, शाहीद शेख आदि उपस्थित होते.

ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, असे विविध प्रेरक गीत व भजन अंध विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रास्ताविकात महेश देशपांडे यांनी पत्रकार हा बातम्यातून अन्यायाला वाचा फोडण्याचे व समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकला.

मीना मुनोत म्हणाल्या की, पत्रकारितेबरोबर सामाजिक सेवेचा जांभेकरांचा वारसा प्रेस क्लब पुढे चालवत आहे. अनामप्रेमच्या वतीने अंध व्यक्तींना समाजात उभे करण्याचे काम चालू आहे. परमेश्‍वर दिव्यांगाना एक बाजू कमी देतो, तर दुसऱ्या बाजूने शक्ती देत असतो. अपंगत्वावर मात करत ध्येय गाठण्याचे आवाहन करुन, विद्यार्थ्यांना मिठाईसाठी एक हजार एक रुपयाची वैयक्तिक रोख मदत त्यांनी दिली.

भूषण देशमुख म्हणाले, समाजाचा कान, नाक व डोळा वृत्तपत्र असतो. समाजाला शिकवण्याचे काम वृत्तपत्र व माध्यम करत असतात. विकासात्मक वाटचालीसाठी वृत्तपत्र व माध्यमांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. मन्सूर शेख म्हणाले, पत्रकारितेसह सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्यासाठी प्रेस क्लब विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. 

मागील वर्षी पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त अकोलनेर येथे जलयुक्त शिवार अभियानाला आर्थिक मदत देण्यात आली होती तर या वर्षी अंध विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित कुलकर्णी यांनी केले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages