728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

दौंडचे ७ भाविक आैरंगाबाद हायवेवर अपघातात ठार


अहमदनगर । DNA Live24 - बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या ७ भाविकांचा बोलेरो व ट्रक अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात नगर-आैरंगाबाद हायवेवर जेऊर टोलनाक्याजवळ धनगरवाडी गावाच्या शिवारात आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भाविकांचा समावेश आहे. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला आहे.

मनोहर रामभाऊ गायकवाड (वय ४५), अंकुश दिनकर नेमाने (वय 45, माळशिरस, पुरंदर), मुबारक अबनास तांबोळी (वय 52), 4) बाळू किसन चव्हाण (वय 50), स्वप्नील बाळू चव्हाण (वय 17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40) व अरुण पांडुरंग शिंदे (सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. मृतांमध्ये बाप -लेकाचा सहभाग आहे.

हे सर्वजण बोलेरो जीपमधून (एमएच १२ एफएफ ३३९२) मधून औरंगाबाद रस्त्याने बुलढाण्याला निघाले होते. ते सर्व बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. धनगरवाडी शिवारात आल्यानंतर चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यामुळे जीप दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. त्यामुळे जीपमधील भाविक जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने क्रेनच्या साह्याने अडीच तास अंधारात शर्थीचे प्रयत्न करून वाहने बाजुला केली. तोपर्यंत वाहतूक एका बाजूने सुरु होती. सर्वांचे मृतदेह सकाळी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: दौंडचे ७ भाविक आैरंगाबाद हायवेवर अपघातात ठार Rating: 5 Reviewed By: DNA Live24