728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नि:स्वार्थी सेवा हीच कामाची खरी पावती

अहमदनगर । DNA Live24 - नि:स्वार्थी सेवा हीच खऱ्या अर्थाने कामाची पावती असते. नोकरी हे केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन नसून देशाचे भावी सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे सेवाव्रत आहे, नगर येथील न्यू आर्टस् महाविद्यालयातील 17 सेवकांचा सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभाप्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, रा. ह. दरे, अ‍ॅड. विश्‍वास आठरे, सिताराम खिलारी, अरुणा काळे, वसंत कापरे, बाळासाहेब हराळ, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे आदि उपस्थित होते. उपाध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या कमरतेमुळे महाविद्यालयांवर विपरित परिणाम होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य एम. व्ही. गिते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर तर डि. पी. भिसे यांनी आभार मानले.

पाहुण्यांच्या हस्ते डॉ. एस. एस. जाधव, डॉ. एस. जे. बाबर, जी. एस. काथार, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. व्ही. एफ. देसले, एन. बी. गांगर्डे, एस. बी. उगले, एस. टी. काकडे, डि. ई. सुपेकर, के. एम. सोनवणे, एस. बी. घोळवे, व्ही. आर. भंडारे, जी. एस. कडूस, एम. बी. अमृते, डी. एन. दहातोंडे, ए. डी. मरकड, एस. बी. कोल्हे या सेवकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, सेवानिवृत्त सेवकांची भाषणे झाली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नि:स्वार्थी सेवा हीच कामाची खरी पावती Rating: 5 Reviewed By: DNA Live24