728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

समर्पित कार्यकर्त्यांच्या अर्धांगिनींना अहमदनगर कन्या पुरस्कार

अहमदनगर । DNA Live24 - शहरात सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभ्या असलेल्या, सर्व प्रसंगी जीवनसाथी साथ देणाऱ्या, पतीच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक जीवन जगणाऱ्या पत्नींना शहराच्या स्थापना दिनानिमित्त 'अहमदनगर कन्या पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रहेमत सुलतान फाऊंडेशन व शहरातील विविध संस्थांच्या वतीने दिला जाईल, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष युनुस तांबटकर, सचिव एजाज खान यांनी सांगितले.

रहेमत सुलतान फाउंडेशनच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रातील महिलांना दिल्या जाणाऱ्या अहमदनगर कन्या पुरस्करासाठी यंदा शहेनाज महेबुब सय्यद, ज्योत्स्ना नानासाहेब कदम, शमीम आसिफ खान, उज्वला बहिरनाथ वाकळे, कल्पना विठ्ठल बुलबुले, रेश्मा नादिर खान, शकुंतला अनंत लोखंडे, यशोधरा नितीन बनसोडे, यास्मिन हनिफ शेख, शालन दत्ता वडवणीकर, हेमलता जालिंदर बोरुडे, डॉ. शमा फारुकी, वर्षा संदीप कुसळकर यांना जाहीर झाला आहे.

या सर्व महिला सामाजिक काम करणाऱ्या आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या आहेत. कुटुंबाची एक बाजू त्यांनी भक्कमपणे सांभाळली आहे. म्हणून त्यांचे जीवनसाथी समाजात जे काम उभे करू शकले, त्यामागे या सर्व महिलांच्या असलेल्या त्यागाला, समर्पणाला, त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी, यंदाचे अहमदनगर कन्या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे सन्माननीय महिलांविषयी समाजाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग आहे.

येत्या रविवारी (२१ मे) सायंकाळी साडेपाच वाजता सर्जेपुरा परिसरातील रहेमत सुलतान सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. प्राचार्य शिवाजी देवढे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, स्मिता पानसरे, पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.

या कार्यक्रमात मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, मुस्कान सोशल वेलफेअर, वक्ता मंच आदी संस्था सहभागी आहेत. या वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन युनुस तांबटकर, एजाज खान, संध्या मेढे, आबिद खान, शफाकत सय्यद,आदींनी केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: समर्पित कार्यकर्त्यांच्या अर्धांगिनींना अहमदनगर कन्या पुरस्कार Rating: 5 Reviewed By: DNA Live24