Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ३१ मे, २०१७

सनी लिओनीच्या विमानात बिघाड; दुर्घटना टळली !नवी दिल्ली l DNA Live24 - अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची टीम आज थोडक्यात बचावली. खराब हवामानामुळे सनी लिओनीचं खाजगी विमान कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.


सनी लिओनीने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती शेअर केली आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवानी मोठी घटना टळली, असं सनी लिओनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
सनी लिओनीने हा व्हिडिओ कारमध्ये शूट केला आहे. ज्यामध्ये तिचा पती डॅनियल वेबर आणि तिच्या टीममधील इतर सदस्यही दिसत आहेत. शिवाय सनीने पायलटचेही आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages