728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नूतन पोलिस अधीक्षकांचा नंबर जनतेसाठी खुला

अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नगरचे नूतन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी त्यांनी जनतेला आपला मोबाईल नंबर खुला केला आहे.

जनतेने पोलिस अधीक्षकांच्या ८८ ८८ ३१ ०० ०० या मोबाईल क्रमांकावर अवैध धंद्यांची माहिती द्यावी, असे अवाहन पोलिस अधीक्षक शर्मा यांनी केले आहे. बुधवारी सकाळी आयोजित केलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्याबद्दल आपली ठोस भूमिका जाहीर केली आहे.

जिल्ह्यात राजरोस सुरू असलेली वाळूतस्करी, तसेच अवैध धंदे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर देण्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे. तसेच गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी दत्तक गुन्हेगार योजना राबवणार असल्याचेही ते म्हणाले. पोलिस दलालाही काटेकोर शिस्त लावणार असल्याचे ते म्हणाले आहेत. नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्यासाठी नागपूर पॅटर्न राबवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नूतन पोलिस अधीक्षकांचा नंबर जनतेसाठी खुला Rating: 5 Reviewed By: DNA Live24