Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ३ मे, २०१७

स्वाभिमानी वडार संघाच्या अध्यक्षपदी अमर कुसाळकर

पुणे । DNA Live24 - स्वाभिमानी वडार समाज संघाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. संघाच्या संस्थापक अध्यक्षपदी पुणे येथील अमर कुसाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. आळंदी येथील नादब्रह्म भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 

बैठकीला श्रीकृष्ण मोहिते (बुलढाणा), सुभाष मुदळ (अहमदनगर), मच्छिंद्र धनवटे (औरंगाबाद), अजित पवार (कराड, सांगली), दीपक कुरळपकर (कोल्हापूर), अशोक जेठे (नवी मुंबई), संजय फडतरे (पुणे), सुरेश चौगले (पुणे), रवी शेळके (पुणे), सुखराम शिंदे (धुळे), नामदेव माने (सातारा), अंबादास जाधव (बीड), अनिल माने (मुंबई), आशा चौघुले (कोल्हापूर), संगीता जेठे (पुणे), शितल पवार (पुणे), दिलीप कुर्हाडे (जालना) यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कुसाळकर म्हणाले, बहुतांशी समाज शिक्षणापासून वंचित आहे. समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व समाज संघटित होणे गरजेचे असून, त्यासाठी स्वाभिमानी वडार समाज संघाची स्थापना करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages