728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जीएसटीमुळे 66 वस्तू होणार स्वस्त...


नवी दिल्ली l DNA Live24 - जीएसटी परिषदेने आज झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या सुट्ट्या भागांवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात संगणक प्रिंटरवर 28 ऐवजी 18, काजूवर 18 ऐवजी 12, इन्सुलिनवर 12 ऐवजी 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे.

दरम्यान देशभरात गाजत असलेला सॅनिटरी नॅपकिनच्या करात मात्र कपात करण्यात आलेली नाही.

सिनेमाचे तिकीट स्वस्त होणार

100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के कर लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी सर्व प्रकारच्या तिकिटांवर समान कर ठेवण्यात आला होता.

सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेतील सिनेमांना करातून सवलत देण्यात आलेली आहे. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ही पद्धत बंद होईल. मात्र राज्य सरकारची इच्छा असेल तर सबसिडी दिली जाऊ शकते. मात्र त्याने फार फायदा होणार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 100 रुपयांच्या आत सिनेमाचं तिकीट असेल तर ते स्वस्तात मिळेल.

 जीएसटीचे जुने आणि नवीन दर

संगणक प्रिंटरवर 28 टक्क्यांऐवजी आता 18 टक्केकाजूवरचा कर 18 वरून 12 टक्के100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के करटेलिकॉम क्षेत्रावरील 18 टक्के कर कायमकटलरीवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्केइन्सुलिनवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्केस्कूल बॅगवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्केअगरबत्तीवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जीएसटीमुळे 66 वस्तू होणार स्वस्त... Rating: 5 Reviewed By: DNA Live24