728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शेवगाव हत्याकांडातील आरोपी अल्पवयीन ?


शेवगाव । DNA Live24 - शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरात झालेल्या हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीने अल्पवयीन असल्याचे सांगितले आहे. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यावेळी एकाने आपण अल्पवयीन असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करुन वयाचा पुरावा असलेली कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. ही कागदपत्रे आल्यानंतर तो अल्पवयीन आहे की नाही, याची शहानिशा होणार आहे.

तर अल्ताफ छगन भोसले (रा. मुकिंदपूर, ता. नेवासे) याला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यासाठी त्याची अधिक चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयात केली.

न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी थरारक पाठलागनाट्यानंतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या मागावर एक पोलिस पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्यात अाणखी आरोपींचा सहभाग असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यादृष्टीने अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, शेवगाव तसेच वडुले गावामध्ये मात्र, पोलिसांनी पकडलेल्या आरोपींबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शेवगाव हत्याकांडातील आरोपी अल्पवयीन ? Rating: 5 Reviewed By: DNA Live24