Header Ads

 • Breaking News

  महिलेवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी गजाआड


  अहमदनगर । DNA Live24 - एकतर्फी प्रेमाला व लग्नाला नकार दिला म्हणून सावेडी परिसरातील एका महिलेवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला. तारकपूर बसस्थानक परिसरात बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. चैतन्य रविंद्र टोकेकर (रा. श्रमिकनगर, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.

  ही महिला सकाळी घरासमोर झाडलोट करीत असताना चैतन्य तेथे आला. महिलेला उद्देशून आपले तुझ्यावर प्रेम असल्याचे त्याने सांगितले. तसेच तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महिलेने त्याला ती विवाहित असल्याचे सांगून लग्नाला व त्याच्या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद द्यायला नकार दिला. त्यामुळे चिडून चैतन्यने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.

  याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन चैतन्यविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी कायदा कलमान्वये गुन्ह्याची नोंद आहे. हा आरोपी तारकपूर परिसरात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या व अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याला पकडले.

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक सुनील चव्हाण, विशाल अमृते, संदीप (आण्णा) पवार, दत्ता हिंगडे, भागिनाथ पंचमुख, मल्लिकार्जुन बनकर, रावसाहेब हुसळे, रविकुमार सोनट्टके, दिपक शिंदे, रवि कर्डिले, योगेश सातपुते, सागर सुलाने, चालक पोलिस नाईक बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अधिक चौकशीसाठी चैतन्यला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad