728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

एक जुलैपासून सीए अभ्यासक्रमात बदल

अहमदनगर । DNA Live24 - इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स आॅफ इंडियाने सीएच्या अभ्यासक्रमात बदल केले असून सुधारित अभ्यासक्रम १ जुलैपासून लागू होत आहे. अशी माहिती अहमदनगर सीए असोएिशनचे अध्यक्ष प्रसाद भंडारी यांनी दिली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसायात तसेच कायद्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे सीएला लागणारी व्यावसायिक मूल्ये, गुणवत्ता, तांत्रिक पात्रता यातही आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. 

सीए अभ्यासक्रमासाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यायची असल्यास ३० जूनपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स आॅफ इंडिया व अहमदनगर सीए शाखेतर्फे करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी अधिक माहितीसाठी अहमदनगर सीए शाखा, बुरूडगाव रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन शाखेचे अध्यक्ष प्रसाद भंडारी यांनी केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: एक जुलैपासून सीए अभ्यासक्रमात बदल Rating: 5 Reviewed By: DNA Live24