Header Ads

 • Breaking News

  राष्ट्रवादीच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी दादासाहेब पठारे


  पारनेर । DNA Live24 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष दादासाहेब पठारे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते दादासाहेब पठारे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दिपक पवार, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, बापूसाहेब भापकर, सुरेश पठारे, सतीश पठारे, बाबासाहेब खिलारी, सोमनाथ धूत, शंकर नगरे, गजानन भांडवलकर, सुभाष बेलोटे, भाऊ गायकवाड आदिंसह पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  दादासाहेब पठारे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीस प्रयत्न करणार असून, पक्षाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहिल. माजी आमदार वसंतराव झावरे यांनी भुविकास बँकेत अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. आज सुजित झावरे यांच्यामुळे तालुकाध्यक्ष पदावर संधी मिळाली. पक्षाचे संघटन पुर्ण ताकतीने केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

  Post Top Ad

  Post Bottom Ad