728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

महाराष्ट्र बंद !
2:30 AM - अहमदनगर : नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे टोल नाक्यावर शेतीमाल व दुधाचे टँकर अडवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी मात्र वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. शिवसेनेचे काही पदाधिकारी पोलिसांनी घेतले ताब्यात.

2:30 AM - अहमदनगर : आंदोलकांचा गनिमी कावा रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज़्ज. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग, गावागावात पोलिस पथके तैनात. महाराष्ट्र बंद शांततेत करण्याचे आवाहन.

1:10 AM - अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव चौफुल्यावर (शनिचौकात) दुधाचा टँकरच्या (एमएच १६ एवाय ८०८८) काचा फोडल्या. टँकरमधील दूध रस्त्यावर सांडले. चालक फरार. सोनई व एमआयडीसी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल. हल्लेखाेर शेतकरी नव्हे, तर सोनई परिसरातील स्थानिक असल्याची सूत्रांनी माहिती.

12:05 AM - शेतकरी संपाचा सलग चौथा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकऱ्यांचे समाधान नाहीच. संपावर ठाम, सोमवारी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन.

10:00 PM - अहमदनगर : राहुरी खुुर्द येथील गोटुंबे आखाडा येथे दुधाचा टँकर पेटवला. पोलिस घटनास्थळी.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: महाराष्ट्र बंद ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24