728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

विद्यार्थीदशेतच मुलांना वृक्षांची गोडी लागावी


अहमदनगर । DNA Live24 - वृक्षारोपणाचा संदेश देत मुलांची मानसिकता बदलणे हा चांगला पर्याय आहे. कारण विद्यार्थीदशेपासूनच मुलांना वृक्षांविषयी आपलेपणा वाटला पाहिजे. तसे झाले तरच भविष्यातील प्रदुषणाचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, अन् पर्यावरणाचा ऱ्हास वाचेल, असे प्रतिपादन जीकेएन कंपनीचे ज्ञानेश्वर डमाले यांनी केले. पारगाव भातोडी येथे पूर्व प्राथमिक वर्गाचे उद्धाटन करताना ते बोलत होते.

डॉ. बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेच्या डॉ. शरद कोलते इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नव्यानेच पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. विजय शिंदे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, दत्तात्रय काळे, अशोक धलपे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डमाले व संदीप गुंड यांच्या हस्ते मुलांना गुलाबपुष्प देवून त्यांचे वर्गात स्वागत करण्यात आले.

विजय शिंंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार करताना त्यांना रोपांच्या बिया देण्यात आल्या. यावेळी डमाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संदीप गुंड यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पुष्पलता शिंदे यांनी केले. तर आभार अमोल दहातोंडे यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: विद्यार्थीदशेतच मुलांना वृक्षांची गोडी लागावी Rating: 5 Reviewed By: DNA Live24