Header Ads

 • Breaking News

  एकात्मिक शेतीतूनच मिळेल शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न - डॉ. कोकाटे


  राहुरी । DNA Live24 - वाढता उत्पादन खर्च ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे एकात्मिक शेती पध्दतीतुन शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न निश्चित मिळू शकेल, असे प्रतिपादन राहुरी कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी केले.

  नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या 'शेतकरी प्रथम' या प्रकल्पांतर्गत राहुरी विद्यापीठात आयोजित चिंचविहिरे गावातील शेतकरी महिलांच्या गट चर्चेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. कल्याण देवळाणकर, रायभान गायकवाड उपस्थित होते.

  यावेळी डॉ. कोकाटे म्हणाले की, जमीन ही मातेसमान असल्याने तिची सुपिकता टिकवणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करुन सेंद्रिय कर्ब वाढविणे गरजेचे आहे. ज्याद्वारे पिकांचे उत्पादन वाढविणे शक्य होईल, असा विश्वासही कोकाटे यांनी व्यक्त केला.

  यावेळी कृषी विद्यापिठाचे शास्रज्ञ डाॅ. अनिल दुरगुडे, प्राध्यापक मंजाबापू गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी शेतकरी प्रथम प्रकल्पाची माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर रुपाली  गिते यांनी आभार मानले. गटचर्चेसाठी चिंचविहिरे गावातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad