Header Ads

 • Breaking News

  निमगावच्या युवकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

  अहमदनगर । DNA Live24 - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच तंबाखू विरोधी सेवन दिनानिमित्त युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी भागचंद महाराज जाधव यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मयुर काळे, ऋषीकेश बोडखे, नितीन बोडखे, सोमनाथ डोंगरे, स्वप्निल डोंगरे, स्वराज डोंगरे, संतोष फलके, गौतम फलके, किरण ठाणगे, संदीप डोंगरे, वैभव पवार, सचिन जाधव आदि उपस्थित होते.

  नाना डोंगरे यांनी उपस्थित युवकांना तंबाखू व धुम्रपानाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगून, व्यसनमुक्तीचे आवाहन केले. तंबाखू व धुम्रपानाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे व जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad