Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, २९ जून, २०१७

पोलिसांनी कार्यक्षम राहिले तरच गुन्हेगारीवर अंकुश


अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जबरी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक पोलिसाने आपले कर्तव्य ठोस बजावले तर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, असे प्रतिपादन पोलीस मित्र संघटनेचे शहर अध्यक्ष अमित इधाटे यांनी केले.

तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगांवकर व त्यांच्या सहकारी पोलिसांनी नुकतीच केलेली एक मोठी कारवाई करुन रॅकेटला जरेबंद केल्यामुळे पोलिस मित्र संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस मित्र संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुमित दरंदले, शहर अध्यक्ष अमित इधाटे, शहर कार्याध्यक्ष अंकुश भापकर, उपनगर अध्यक्ष किरण मेहेत्र, राजेंद्र कर्डिले, पोलिस कॉन्स्टेबल दिपक रोहोकले, भास्कर गायकवाड, संजय काळे, धिरज अभंग आदी उपस्थित होते.

भारतात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस असतात. पण पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे, दुर्लक्षामुळे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांत वाढ झाली. चोरांना पोलिसाचे व कायद्याचे भय राहिलेले नाही. तोफखाना पोलिसांनी एक कोटींचा गांजा पकडून जी कारवाई केली ,अशा कारवाया जर सतत होत राहिल्या, तर गुन्हेगारांना चाप बसेल. अवैध व्यावसायिकांवर वचक निर्माण होईल. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी किंवा मदतीसाठी पोलिस मित्र संघटना कायम तत्पर असेल, असेही शहर कार्याध्यक्ष अंकुश भापकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages