Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, २९ जून, २०१७

'रेसिडेशिअल'चे ५८ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र


अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रेसिडेशिअल हायस्कूलचे इयत्ता पाचवीचे ३५, तर इयत्ता आठवीचे २३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सह्याद्री अर्जुन गायकवाड ही 274 गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत अकरावी व जिल्ह्यात चौथी आली. तर आठवीतील विद्यार्थिनी राजश्री बाबासाहेब घुंगार्डे ही 270 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी व राज्य गुणवत्ता यादीत बारावी आली.

रेसिडेशिअल हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीेक्षेसाठी स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. त्यासाठी घटक व विषयनिहाय सराव परीक्षा घेतल्या जातात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीसाठी एस. एम. गायकवाड, सी. सी. अमृते, एस. बी. दरे, पी. एम. री. अमृते यांनी तसेच इयत्ता आठवीसाठी जे. एन. नारळे, एच. डी. कुटे, जे. एस. काळदाते, एस. आर. थोरवे यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रा. ह. दरे, ज्येष्ठ विश्‍वस्त सिताराम खिलारी व प्राचार्य ए. आर. दोडके यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages