728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद - गडाख


नेवासे । DNA Live24 - नेवासा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणवंत गौरव सोहळा नुकताच पार पडला. शनि शिंगणापूरच्या श्री शनैश्वर माध्यमिक विद्यालयात हा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शिक्षणप्रेमी तथा पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर तांबे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात गडाख यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले.

सुनिताताई गडाख म्हणाल्या, शहरी भागातील सुखसोयी, सुविधा, शहरी वातावरण नसूनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट, शिक्षकाचे अनमोल मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ या आधारावर जे घवघवीत यश मिळविले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. शाळेत असताना ९३, ९४ टक्क्यांइतके गुण आम्हीही मिळवू शकतो. हे गुणवंतांनी दाखवून ग्रामीण भागाची गुणवत्ता सिद्ध केली. शेतीकामात घरच्यांना सहकार्य करून, घरगुती कामे करून हे कौतुकास्पद यश मिळविले आहे.

माध्यमिक शिक्षक संघटना विद्यार्थ्यांसाठी हा गुणवंत गौरव सोहळा यासारखा उपक्रम राबवते. यातून विद्यार्थ्यांना पाठबळ मिळते. विशेष म्हणजे इतरांनी कौतुक करण्यापेक्षा ज्या गुरूजनांनी आपल्याला ज्ञानदान केले, त्या गुरूजनांच्या श्रमातून उतराई होण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो. परंतु गुणवंत गौरव सोहळा उपक्रम राबवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे सर्वोत्तम यश आहे. हे गुरूजनांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून दाखवून दिले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी शिक्षक नेते राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, जनार्दन पटारे, उद्धव सोनवणे, भिमराज खोसे, अशोक सोनवणे, जगन्नाथ आढाव, आप्पासाहेब शेटे, बी. डी. शिंदे, सुनिल दानवे, योगेश बानकर, किशोर भणगे, शालिनी लांडे, पंडितराव खाटिक, पाराजी मोरे, राहुल राजळे, लोडे, येळवंडे, आघाव, मुख्याध्यापिका आशा कर्डिले, आदींसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल दानवे व येळवंडे यांनी केले. तर प्रास्ताविक अप्पासाहेब शेटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेवासा तालुका माध्यमिक शिक्षक संघटना प्रयत्नशील होती.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद - गडाख Rating: 5 Reviewed By: DNA Live24