728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'बबन'ला नेटीझन्सचा उदंड प्रतिसाद !

सायली लवटे । DNA Live24 - 'ख्वाडा' या पहिल्याच चित्रपटाद्वारे राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दिमाखदार एन्ट्री करणारा मराठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे याने प्रेक्षकांच्या मनावर अनेक दिवस अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे यांनी आता 'बबन' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा पहिलाच टीझर नुकताच रिलिज झाला आहे. 

'ख्वाडा'ची मोहिनी जरा कुठे कमी होत नाही, तोच भाऊरावच्या 'बबन'च्या टीजरने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण, अवघ्या दोन दिवसांत या टीजरला मिळालेल्या हिट्सनी नेटीझन्समध्ये असलेली बबनची उत्सुकता दिसून येतेयं.. दोन-तीन दिवसांतच या टीजरला तब्बल अर्धा लाख लोकांनी भेट दिली आहे. आणि सोशल मिडियावरही त्याची धूम सुरूच आहे. लवकरच येऊ घातलेल्या गुलाबी थंडीत बबनची प्रेमकथा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मार्चमध्येच या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले हाेते. 

भाऊ कऱ्हाडे यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर - 'बबन' आपल्या अवतीभवती नेहमी असतो. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात, प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर आणि प्रत्येक ठिकाणी.. इतकं 'बबन' हे कॉमन आणि जवळचं नाव आहे. हा एक वेगळ्या धाटणीवरचा मराठी सिनेमा आहे. याद्वारे एक वेगळी अॅक्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे भाऊ कऱ्हाडे DNA Live24 शी बोलताना म्हणाले.

'बबन'चा टीजर पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.. (सौजन्य : चित्राक्ष फिल्मस्, यु ट्युब)

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'बबन'ला नेटीझन्सचा उदंड प्रतिसाद ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24