728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर 'छावा'चा ठिय्या !

 अहमदनगर । DNA Live24 - शहराच्या प्रमुख रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. छावा संघटनेचे शिष्टमंडळ मनपात आले असता एकही सक्षम अधिकारी नसल्याने संतप्त आंदोलकांनी मनपा आयुक्तांच्या दालना बाहेरील नावाच्या पाटीस पुष्पहार घालून, ठिय्या मांडला.

यावेळी आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, युवक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता वामन, योगेश पवार, किरण उंडे, भरत लवांडे, दत्ता इरले, पप्पू तोडमल, सतीश वाघ, आकाश धनवळे, तुषार शिंदे सहभागी झाले होते. मनपाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही दिवसापुर्वी पॅचिंग करण्यात आली होती. मात्र काही पावसातच पॅचिंग उखडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. 

खड्डे चुकविताना शहरात दररोज लहान मोठे अपघात घडत आहे. तर यामुळे वाहतुक कोंडीस देखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील खड्डेमय रस्त्यांनी नागरिकांना पाठ दुखीच्या व्याधी सुरु झाल्या असून, मोठा पाऊस झाल्यास रस्त्यांची मोठी दुरावस्था होण्याची संभावना आहे. तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्त दिलीप गावडे यांना देण्यात आले. 

मनपा आयुक्त दिलीप गावडे यांनी तातडीने रस्ता पॅचिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन आंदोलकांना दिले. सात दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास छावा संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर 'छावा'चा ठिय्या ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24