728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शनैश्वर रिक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर आल्हाट

घोडेगाव । DNA Live24 (दिलीप शिंदे) - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील शिंगणापूर ते घोडेगाव या मार्गावर चालणा-या रिक्षा चालक मालक संघटनेची शनिवारी बैठक झाली. त्यात अध्यक्षपदी मधुकर आल्हाट तर उपाध्यक्षपदी नितीन बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष रामभाऊ गोलवड यांचे अध्यक्षतेखाली ही निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदासाठी मधुकर आल्हाट यांच्या नावाची सुचना नवनाथ कोकाटे यांनी केली. त्याला बाळासाहेब गुडघे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी नितीन बर्डे यांच्या नावाची सुचना सतिष वैरागर यांनी केली. त्याला अजय बर्डे यांनी अनुमोदन दिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष – उपाध्यक्षाचा पुष्प गुच्छ, फेटा, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गणेश दारकुंडे, माउली कोकाटे, शिवाजी खंडागळे, योगेश काकडे, बाबासाहेब गांधले, रावसाहेब कु-हाडे, शिवाजी पवार, चंदन पवार, रहेमान शेख यांच्यासह रिक्षाचालक – मालक उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर आल्हाट म्हणाले, सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यात येणा-या तिस-या शनिवारी शनिभक्तांसाठी जो भंडारा / लंगर शनि चौकात आयोजित केला जातो. त्यात आणखी वाढ करण्यात येईल. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे जाणा-या येणा-या अंध अपंग वृद्ध भाविकांकडे पैसे नसल्यास मोफत प्रवास सेवा दिली जाते. तर ज्या भाविकांना अडचणीचा प्रसंग येतो, त्यावेळी आमची रिक्षा संघटना त्यांना दवाखाना व त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी रोख रकमेची मदत करते. 

सोनई – शिंगणापूर – घोडेगाव या मार्गावर प्रवासी व भाविकांना अपघातसमयी तातडीच्या सेवा उपलब्ध करून देते. यापुढे ही भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांचा प्रवास सुखकर व आनंदी होण्यासाठी आमची संघटना योग्य सेवा व मदत करण्यास तत्पर राहिल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .  
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शनैश्वर रिक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर आल्हाट Rating: 5 Reviewed By: DNA Live24