Header Ads

 • Breaking News

  महा-मेडिकल कॅम्पमध्ये 200 बंद्यांची आरोग्य तपासणी


  अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी श्रीगोंद्याच्या धन्वंतरी सोशल फोरमच्या सहकार्याने महा-मेडिकल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारागृहातील दोनशे कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने या शिबिरात सहभागी होत बंद्यांची तपासणी करुन विविध आजारांचे निदान केले. तसेच त्यांना औषधे दिली.

  या महा-मेडिकल कॅम्पसाठी जिल्ह्यातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अतुल नरसाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. नितीन खामकर, डॉ. उमेश हांडे, डॉ. सचिन जाधव यांनीही कारागृहातील बंद्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शरीराची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता, त्वचारोगांची कारणे, याबद्दल घ्यावयाची काळजी व उपाय याविषयी मार्गदर्शन केले.

  कारागृहातील बंद्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये त्वचा रोग, हृदयरोग, क्षयरोग, मूळव्याध, तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली. धन्वंतरी सोशल फोरमचे डॉ. विकास साेमवंशी, डॉ. महादेव कोरसाळे, डॉ. जयेश कदम, डॉ. मच्छिंद्र जांभळे, डॉ. अशोक खेंडके, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. गोविंद भोईटे, डॉ. दिगंबर हिरवे, शरद शिंदे यांनी बंद्यांची तपासणी केली.

  या मेडिकल कॅम्पचे सूत्रसंचालन कारागृहाच्या मिश्रक क्रांती सोनमाळी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार कारागृहाचे अधीक्षक नागनाथ सावंत व सिनिअर जेलर शामकांत शेडगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय खंडागळे यांनी केले. या कार्यक्रमाला कारागृहाचे तुरुंगाधिकारी तानाजी धोत्रे, देविका बेडवाल, इतर कर्मचारी उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad