728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

लोणी मावळा खटला : आरोपींचे जबाब नोंदवले


अहमदनगर । DNA Live24 - लोणी मावळा (ता. पारनेर) बलात्कार खटल्यामध्ये तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पहात आहेत. त्यांनी आतापर्यंत ३२ साक्षीदार तपासले आहेत.

ऑगस्ट २०१५ मध्ये पीडित शाळकरी मुलगी परीक्षा देऊन घरी जात होती. सायंकाळच्या वेळी पाऊस आला म्हणून ती एका पुलाखाली आश्रयाला थांबली. त्यावेळी तिच्या पाठलागावर असलेल्या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा खून केला. या प्रकाराने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली होती. सुरुवातीला आरोपीचा तपास लागत नव्हता म्हणून भीतीमुळे येथील अन्य मुलींना शाळेत पाठवणेही पालकांनी बंद केले होते.

पारनेरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी गुन्ह्य़ाचा तपास करून संतोष लोणकर, मंगेश लोणकर (दोघेही रा. लोणी मावळा, ता. पारनेर) आणि दत्तात्रेय शिंदे (रा. अंबड, बीड) या तीन आरोपींना अटक केली. सरकार पक्षातर्फे सर्व साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. परिमल फळे व इतर काम पहात आहेत. खटल्याची पुढील सुनावणी १७, १८ व १९ ऑगस्टला होणार आहे. या खटल्याची सुनावणीही जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: लोणी मावळा खटला : आरोपींचे जबाब नोंदवले Rating: 5 Reviewed By: DNA Live24