728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार गांधींचे गॅस वितरण


अहमदनगर । DNA Live24 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलैला दुपारी ३ वाजता ताहाराबाद (ता. राहुरी) येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस वाटप करण्यात येणार आहे. तसेच खासदार स्थानिक विकास निधीतून लावण्यात आलेल्या हायमॅक्स दिव्याचे लोकार्पणाचा कार्यक्रम राहुरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
 
वाढदिवसाचे फ्लेक्स व जाहिरातींना फाटा देत हा रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. तसेच या दिवशी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विधायक कार्यक्रमांचे आयोजन करावे अशा सूचनाहि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत.

त्यानुसार राहुरी भारतीय जनता पार्टीने ताहराबाद येथे उज्वला गॅस वितरण व हायमॅक्स दिव्यांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली  केले आहे, अशी माहिती राहुरी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम तांबे व भाजपा जेष्ठ नेते आसाराम पाटील ढूस यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी भाजप व्यापारी आघाडीचे पंकज गुंदेचा, अमोल भगनडे, शरद उदावंत, बाळासाहेब गाडे आदी मेहनत घेत आहेत
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार गांधींचे गॅस वितरण Rating: 5 Reviewed By: DNA Live24