728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मुळा धरण ५० टक्के भरले !
राहुरी । DNA Live24 - सव्वीस हजार दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा शनिवााी दुपारी १३ हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे राहुरीचे मुळा धरण ५० टक्के भरले आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्याने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ सुरू झाली आहे.

आज दुपारी कोतुळकडुन मुळा धरणात १५ हजार २७१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. जिल्ह्याची कृषी पंढरी म्हणुन मुळा धरणाची ओळख आहे. राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या कार्यक्षेञातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबुन असल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा वाढण्याकडे लाभक्षेञातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हरिश्चंद्रगडावर गेल्या 10 दिवसापासुन झालेला पाऊस मुळा धरणाचा पाणीसाठा वाढण्यास मोलाचा ठरला आहे. गेल्या 1 जून ते 22 जुलै या कालावधीत मुळा धरणात 8 हजार दशलक्ष घनफुट पाणी नव्याने दाखल झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला तरी मुळा धरणाच्या लाभक्षेञात अद्याप समाधान कारक पाऊस झालेला नाही.

दमदार पावसाच्या आगमनाकडे लाभक्षेञातील  शेतकरी लक्ष ठेऊन आहे. सव्वीस हजार दक्षलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 13 हजार दशलक्ष घनफुट झाल्याने धरण 50 टक्के भरले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मुळा धरण ५० टक्के भरले ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24