728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

गतिमान कामकाजासाठी उत्पादन शुल्कचा उजळणी वर्ग


अहमदनगर । DNA Live24 - राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कामाची गतिमानता वाढावी, त्यांना विभागाच्या कामाच्या अनुषंगाने कायद्याचे आकलन व्हावे, यादृष्टीने आयोजित केलेल्या उजळणी वर्गाचा समारोप शुक्रवारी झाला. दिनांक १७ ते २१ जुलै या कालावधीत या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या उजळणी वर्गात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक पराग नवलकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरुण जगताप यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या या उजळणी प्रशिक्षण वर्गात मैदान कवायत सराव, आधुनिक शस्त्रांची माहिती, गुणात्मक गुन्हे अन्वेषण, विभागाचे इतर अनुषंगिक आवश्यक माहिती आणि कायद्याची माहिती प्रशिक्षकांद्वारे देण्यात आली.

या उजळणी प्रशिक्षण वर्गाचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शहर पोलीस उप अधिक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, तानाजी बरडे, वंदना कदम, अरुण जगताप, सतीश माशालकर आदींच्या उपस्थितीत झाला. या प्रशिक्षण वर्गात पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, अभय परमार, सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, नारायण वाखारे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: गतिमान कामकाजासाठी उत्पादन शुल्कचा उजळणी वर्ग Rating: 5 Reviewed By: DNA Live24