Header Ads

  • Breaking News

    'यादे रफी' सुमधूर गीतांची मेजवानी


    अहमदनगर । DNA Live24 - सुप्रसिध्द गायक स्व. मोहंमद रफी यांच्या स्मृतीदिना निमित्त पंचमदा फॅन्स फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी ३१ जुलैला सावेडी येथील माऊली सभागृहात 'यादे रफी' या सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीत मैफलमध्ये स्थानिक कलाकारांसह मुंबई, पुणे व नाशिक येथील कलाकार जुन्या गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कलारसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    ही संस्था यापुर्वी 'आर. डी. बर्मन फॅन्स क्लब' या नावाने गेल्या आठ वर्षापासून कलारसिकांसाठी कार्यरत होती. या संस्थेची पंचमदा फॅन्स फाऊंडेशन या नावाने नोंदणी झाली असून, ही संस्था विविध सिनेगीतांच्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन करीत आहे. जुन्या गीतांचे कार्यक्रम घेण्यासाठी ही संस्था नावारुपास आली असून, संस्थेच्या वतीने यापुर्वी आर. डी. बर्मन हिट्स, किशोर कुमार हिट्स, राजेश खन्ना हिट्स, लक्ष्मीकांत प्यारेलाल हिट्स, कल्याणजी आनंदजी हीट्स असे कार्यक्रम घेतलेले आहेेत.

    कलारसिकांचे मनोरंजन करणे व स्थानिक नवोदित कलाकारांना व्यासपिठ निर्माण करण्याच्या हेतूने या संस्थेचे कार्य चालू आहे. ज्या कला रसिकांना पंचमदा फाऊंडेशनचे सभासदत्व पाहिजे आहे, त्यांनी संदिप भुसे 9822870618 व डॉ. सत्तार सय्यद 9890050305, 9595150305 यांच्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad