728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कलकत्त्याला निघालेले चोरटे रेल्वे स्टेशनवरच चतुर्भुज


अहमदनगर । DNA Live24 - पाईपलाईन रोडवरील हॉटेल सागर परमीट रुममध्ये चोरी करुन पळालेले आरोपी शिर्डीमध्ये जेरबंद करण्यात आले. शनिवारी पहाटे चोरी पळालेले आरोपी कलकत्त्याला जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अमित मनोरंजन पाल (वय २२), सौरभा सोपान कुंभकर्ण (२२, दोघेही रा. वैदुवाडी, मूळ- चंदननगर, पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

पाल व कुंभकर्ण यांनी शनिवारी पहाटे सागर हॉटेलमध्ये चोरी करुन वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी दारुच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, होम थिएटर, मोबाईल फोन, चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक पाटील यांच्या पथकातील पोलिस हवालदार राजू वाघ यांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपींचा माग काढला असता ते शिर्डीत असल्याचे समजले. त्यानुसार शिर्डीचे उपअधीक्षक सागर पाटील, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, फौजदार दहिफळे, संदीप कहाळे, पोलिस नाईक औटी, थोरात, पंडोरे, लोंढे, कुऱ्हे आदींच्या पथकाने साईनगर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. रेल्वेचे फौजदार बैनीप्रसाद मीना, कर्मचारी कोळगे, एन. पाटील आदींनी आरोपींना पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कलकत्त्याला निघालेले चोरटे रेल्वे स्टेशनवरच चतुर्भुज Rating: 5 Reviewed By: DNA Live24