728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शेवगाव हत्याकांडातील 'तो' जखमीही दगावला


शेवगाव । DNA Live24 - शेवगाव दुहेरी हत्याकांडानंतर या घटनेतील अत्यवस्थ असलेल्या जखमीचे सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बाळासाहेब रमेश केसभट (वय २८, रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) असे त्याचे नाव आहे. 

शेवगाव ते आखेगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी दोघांचे मृतदेह अाढळले होते. तर बाळासाहेब जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले होते. त्याच्या मृत्यूमुळे या हत्याकांडाचे गूढ आणखीनच वाढले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे करीत आहेत.

सोमवारी सकाळी आखेगाव रस्त्यावर फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी तिघा जणांना रस्त्याच्या कडेला पडलेले पाहिले होते. त्यांनी पोलिसांनी कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक रामनाथ गाेर्डे (वय ३५, रा. धनगरवस्ती, शेवगाव) व मंगल अनिल अळकुटे (वय ३६, रा. दहिगावने, शेवगाव) हे दोघे मृत अवस्थेत पडलेले होते. तर बाळासाहेब अत्यवस्थ होता. याप्रकरणी पोलिसांनी मंगलच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवलेला आहे.

बाळासाहेबला नगरला उपचारांसाठी हलवले तेव्हा तो अत्यवस्थ बेशुद्धावस्थेत होता. दुपारी उशिरा त्याने हालचाल केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. मात्र, तो शुद्धीवर आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याचा जबाब नोंदवता आलेला नव्हता. त्यामुळे पोलिस त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात होते. मंगळवारी दुपारी मात्र त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले. 

सुरूवातीला अनैतिक संबंधांतून हे हत्याकांड झाल्याचे पोलिस सांगत होते. आता मात्र पोलिसांपुढील तिढा वाढला आहे. या हत्याकांडामागचे नेमके कारण काय, याची उकल पोलिसांना करावी लागणार आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शेवगाव हत्याकांडातील 'तो' जखमीही दगावला Rating: 5 Reviewed By: DNA Live24