Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, १ जुलै, २०१७

नगर जिल्ह्यासाठी २ हजार कोटींची कर्जमाफी : पालकमंत्री राम शिंदे


नगर l DNA Live24 - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा जिल्ह्यातील अंदाजे ३ लाख ९५ हजार शेतकर्‍यांना लाभ मिळणार असून, एकूण २ हजार ३३ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी जिल्ह्याला मिळण्याची  शक्यता असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी खा. भाऊसाहेब  वाकचौरे, माजी आ. चंद्रशेखर कदम, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, प्रांताधिकारी वामन कदम आदी उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले की, ३० जून २०१६ अखेर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७१३ शेतकर्‍यांची दीड लाखांच्या आत थकबाकी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ९७३ कोटी ५१ रुपये जिल्ह्याला मिळतील. जिल्ह्यात दीड लाखांच्या वर थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ३७ हजार २०२ आहे. त्यांच्यासाठी ६०७ कोटी ७० लाखांची आवश्यकता आहे. सन २०१५-१६ मध्ये ३ लाख ४१ हजार २८६ शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केली.

ज्या १ लाख ८४ हजर ६४९ शेतकर्‍यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली त्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ४६१ कोटी ६२ लाखांची रक्कम मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण ३ लाख ९५ हजार ५९४ शेतकर्‍यांसाठी २ हजार ३३ कोटी ९३ लाखांची रक्कम जिल्ह्याला मिळू शकेल. अर्थात अजून यामध्ये शासन निर्णयातील निकष लागणार असल्याने आकडेवारीत तफावत राहणार असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

दीड लाखाच्या पुढील थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांनी ‘वन टाइम सेटलमेंट’ केल्यास त्यांना २५ हजाराची सवलत मिळणार आहे. ते करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत असल्याची अफवा आहे. त्यासाठी ३० जून पर्यंतची मुदत नसल्याचेही ते म्हणाले.

अन्यथा त्या बँकांवर करवाई - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना असो अथवा खरीप हंगामासाठी थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपये पीक कर्ज देण्याची योजना असो. या योजना राबविणे बँकांना बंधनकारक असून, शासनाला व शेतकर्‍यांना सहकार्य न करणार्‍या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages