728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मिनी कॅरम स्पर्धेत आय्युब सय्यद विजयी


अहमदनगर । DNA Live24 - नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात अमन कॅरम हाऊसच्या वतीने घेण्यात आलेल्या मिनी कॅरम टुर्नामेंटमध्ये 19 गुणांनी आय्युब सय्यद याने विजय संपादन केला. कोठला येथे सहा दिवस चाललेल्या कॅरम टुर्नामेंटमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना आय्युब सय्यद व रफिक बेग यांच्यात झाला. सय्यद याने 29 गुणांची कमाई केली. तर बेग यांना 10 गुणांवर समाधान मानावे लागले.

प्रथम विजयी खेळाडू सय्यद यांना तीन हजार रुपयाचे बक्षिस ह्युमन राईटचे शहर जिल्हाध्यक्ष इसरार शेख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तसुवर मिर्झा, भाऊ पगारे, अकिब सय्यद, कय्युम सय्यद, गुलाब सय्यद, फरीद शेख, वसिम काझी, अबरार शेख, शेखर बिठापेल्ली, अजय पगारे, संदीप परदेशी, शहेबाज खान, तौसिफ शेख, मोहसीन शेख, शहेबाज शेख, सादिक शेख आदि उपस्थित होते. या स्पर्धेतील द्वितीय रफिक बेग, तृतीय अस्लम सय्यद यांना अनुक्रमे दोन हजार व एक हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस शहेबाज सय्यद यांना देण्यात आले. यावेळी ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष इसरार शेख म्हणाले की, युवा शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आजचा युवक मोबाईलच्या खेळात व्यस्त झाला असून, शाररीक व बौध्दिक विकासासाठी इतर खेळ खेळणे आवश्यक आहे. कॅरम खेळाने बुध्दीला चालना मिळून, खेळाडूवृत्ती वृध्दींगत होते. यापुढे कॅरम खेळाडूंसाठी मोठ्या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मिनी कॅरम स्पर्धेत आय्युब सय्यद विजयी Rating: 5 Reviewed By: DNA Live24