728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

प्रहार जनशक्ती संघटनेची २७ जुलैला पदाधिकारी निवड


अहमदनगर । DNA Live24 - आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेची मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. याच हेतूने नगर जिल्हाध्यक्ष व शेतकरी, कामगार संघटनेचे पदाधिकारी निवड करण्यात येणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नांवर रान उठवत सरकारला धारेवर धरलेले आहे. 

आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रहार जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रभर विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, तुर खरेदी आदी मागण्यांसाठी संघटनेने सरकारच्या विरोधात कंबर कसली आहे. यासाठी विविध स्तरांतून कौतुक होत आहे. हे कार्य पुढे चालु ठेवण्यासाठी आता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही संघटना खंबीरपणे उभी राहिल. यासाठी जिल्हा स्तरापसून ते गावपातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २७ जुलैला नगर -मनमाड रोड, नागापूर, बोल्हेगाव फाटा, येथिल बारस्कर कॉम्प्लेक्स मध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तरी आमदार बच्चु कडू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांनी 
92 25 325 621 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन अजय महाराज बारस्कर यांनी केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: प्रहार जनशक्ती संघटनेची २७ जुलैला पदाधिकारी निवड Rating: 5 Reviewed By: DNA Live24