728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'वन मिलियन फुटबॉल'वर बहिष्कार कायम !


अहमदनगर । DNA Live24 - नुकत्याच १८ जुलैला मंत्रालयात शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे व शरीरिक शिक्षण, कला समन्वय समितीची तासिका पूर्ववत करण्यासंदर्भात बैठक झाली. बैठकीत कमी केलेल्या दोन तासिकेपैकी एक तासिका वाढविण्याबाबत अधिवेशानानंतर विचार करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. आश्‍वासनाला बळी पडून काही संघटनांनी बहिष्कार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण शासनाच्या तोंडी आश्‍वासनावर विश्‍वास नसल्याने हे आंदोलन चालू ठेवून, शालेय स्पर्धेवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या आंदोलनात विद्यार्थी, पालक यांना सामावून आंदोलनातची तीव्रता वाढविणार असल्याची माहिती राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, कोषाध्यक्ष घनशाम सानप, व शारीरिक शिक्षण, कला व संगीत विषय बचाव कृती समितीचे सचिव शिवदत्त्त ढवळे यांनी दिली आहे. याबाबत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन राहुरी येथे केले होते. यावेळी महाराष्ट्र शारीरिक शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष व शारीरिक शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण खोडस्कर यांनी बैठकीदरम्यान फोन वरून शिक्षकांशी संवाद साधला.

कला शिक्षकाच्या वतीने विनोद इंगोले तर क्रीडा शिक्षकांच्या वतीने राजेश कदम, सुनील गागरे, शिरीष टेकाडे, राजेंद्र कोतकर, शिवदत्त ढवळे, अप्पासाहेब शिंदे यांनी बाजू मांडली. शासनाचे परिपत्रक किंवा लेखी मिळत नाही तोपर्यंत स्पर्धेवर बहिष्कार कायम राहणार, २८ एप्रिलचे परिपत्रक रद्द करून तासिका पूर्ववत कराव्यात, आरटीई कायद्यात बदल करून कला-क्रीडा शिक्षक कायम ठेवावे, कला-संगीत विषयाप्रमाणे क्रीडा शिक्षकास अतिरिक्त करू नये, शरीरिक शिक्षकांना विशेष शिक्षकाचा दर्जा द्यावा, या मागण्या आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'वन मिलियन फुटबॉल'वर बहिष्कार कायम ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24