Header Ads

 • Breaking News

  मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींना ग्रंथभेट !

  जयवंतराव पा. लिपाणे सरांनी प्रारंभिला नवा पायंडा


  नेवासे । DNA Live24 - लग्नसोहळा म्हटलं की थाटमाट, मानमरातब, पाहुण्यांचा सत्कार, थोरामोठ्यांचा सन्मान, यांवर होणारा खर्च मुलीच्या बापाची दमछाक करतो. पण, अशा मानसन्मानाला खरवंडी येथील समता शिक्षण मंडळाचे सचिव तथा शनैश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव लिपाने सर यांनी फाटा दिला आहे. त्यांनी आपली कन्या चि. सौ. कां. अनघा हिच्या लग्नसोहळ्यात वऱ्हाडी मंडळींना चक्क ग्रंथभेट देत सुखद धक्का दिला आहे.

  लिपाणे सरांची कन्या अनघा हिचा विवाह ३ जुलैला प्रा. संदीप कर्डिले यांच्याशी वडाळा बहिरोबा संपन्न झाला.   याप्रसंगी सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी असणारे दानशूर व्यक्तिमत्त्व प्रा. जयवंतराव लिपाने सर यांनी माजी खासदार यशवंतराव पा. गडाख यांच्या संकल्पनेनुसार व मा. प्रशांतभाऊ पा. गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तकभेटीचा उपक्रम सक्रियपणे राबवला.

  याप्रसंगी वऱ्हाडी मंडळीतील लहान थोर, जेष्ठ मंडळी, माता भगिनी यांना जयवंतराव लिपाने व त्यांच्या सौभाग्यवतीने विविध पुस्तके देऊन सन्मानित केले. या पुस्तकांत सहवास, रामकृष्ण परमहंस यांची ग्रंथसंपदा, स्वामी विवेकानंद विचार, अशी पुस्तके भेट देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, नेवासे तालुका पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गडाख यांनाही ग्रंथ व वाचनीय पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

  यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या उपक्रमानुसार सभापती सुनिताताई गडाख यांनी भावी जीवनासाठी मार्गदर्शक पुस्तके भेट देऊन वधू वरांना शुभेच्छा व शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी नेवासा तालुक्यातील व जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती. लिपाणे सर यांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एक आगळावेगळी परंपरा जन्माला घातली आहे. या नव्या आणि विधायक उपक्रमाचे सर्व वऱ्हाडी मंडळींनी कौतुक केले आहे. परिसरात या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे काैतुक होत आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad