Header Ads

 • Breaking News

  गटारी इफेक्ट : कोंबड्यांच्या बाजारभावात ५० रुपयांनी वाढ !


  राहुरी । DNA Live24 - कोंबड्यांच्या बाजारभावात 50 रूपयांनी वाढ होऊनही खरेदीदारांच्या उड्या पडल्या आहेत. दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गटारी अमावस्याचा हा परिणाम झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. रविवार 23 जुलैला गटार अमावस्या असल्याने राहुरीच्या बाजारात हजारो कोंबड्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. गेल्या काही वर्षापासुन गावराण कोंबड्यांची संख्या घटल्याने अशा कोंबड्या शोधणे मुश्किल झाले आहे.

  गावराण सारख्या हुबेहुब दिसणा-या कोंबड्यांची बाजारात चलती आहे. नगर मनमाड राज्यमार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा बाहेर गुरूवारी कोंबड्यांच्या खरेदी विक्रीचा बाजार सुरू होता. उद्यावर येऊन ठेपलेल्या गटार अमावस्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढली. त्यामुळे विक्रेत्यांनी जिवंत कोंबड्याच्या बाजारभावात 50 रूपयांनी वाढ केली आहे.

  इतर वेळी जिवंत कोंबडीचा बाजारभाव 125 रूपयांदरम्यान असतो. गुरूवारी मात्र जिवंत कोंबडीची 175 रूपयास विक्री झाली. मार्केटमध्ये गावराणसारखी हुबेहुब दिसणा-या कोंबडीचे एक किलोचे भाव 250 रूपये आहे. सोमवारपासुन श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असल्याने शुक्रवार व रविवार हे दोनच दिवस मासांहारासाठी शिल्लक राहिले आहेत. शुक्रवार व रविवार या दोन दिवसात मागणी वाढणार असल्याने जिवंत कोंबड्याच्या बाजारभावात देखील व्यापाऱ्यांनी वाढ केली आहे. 

  Post Top Ad

  Post Bottom Ad