Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, ८ जुलै, २०१७

शालाबाह्य मुलांसाठी शासकीय यंत्रणांना अावाहन


अहमदनगर । DNA Live24 - शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या महासंघातर्फे व स्नेहालय संचलित चाईल्ड लाईन या २४ तास उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईनने जिल्ह्यातील शालेय मुलांसाठी काम करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढळणाऱ्या शालाबाह्य मुलांच्या भविष्यासाठी काम करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

या कार्यात चाईल्ड लाईनची कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास चाईल्ड लाईन व स्नेहालय नेहमी मदत करण्यास तत्पर असेल, असेही चाईल्डलाईनच्या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या निवेदनात विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी स्नेहालय व चाईल्ड लाईनचे सह-संचालक हनिफ शेख, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक प्राची सोनवणे, सदस्य माधुरी पवार, अलीम पठाण, शाहीद शेख, महेश सूर्यवंशी व संकेत होले आदि उपस्थित होते. या पत्राची प्रत माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व महापालिका आयुक्तांना देखील पाठवण्यात आली आहे.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages