Header Ads

 • Breaking News

  मुख्यमंत्र्याची व आमची मुले एका शाळेत शिकतील, तेव्हा खरी समानता !


  राहुरी । DNA Live24 - लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम कामगारांनीच केले आहे. स्वातंत्र्यानंतर उशिराने कामगार संघटना उभ्या राहिल्या. जोखमीचे काम करून घामाचे किमान दाम मिळणार नसेल तर संघर्ष करावाच लागेल. मुख्यमंत्र्यांची मुले जिथे शिकतात, तेथे बांधकाम कामगारांची मुले शिकावीत, असे प्रतिपादन एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी केले.

  श्री विश्वकर्मा बांधकाम व इतर कामगार संघटनेच्या देवळाली प्रवरा येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, कॉ. मदिना शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी गांगर्डे, रणछोडदास जाधव, मनोज संकलेचा, अनुराधा आदिक, संजय बर्डे, भिमा कुसमोडे, बाळासाहेब खुरुड बांधकाम कामगार सदस्य उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वकर्मा बांधकाम संघटना अध्यक्ष रमेश घोरपडे यांनी केले. कामगार आयुक्त अमोल गायकवाड यांनी कामगारांना शासनाच्या योजनेची माहिती दिली. रणछोडदास जाधव यांनी शासन, शासकीय लाभ यांची माहिती दिली. बाळासाहेब चव्हाण यांनी संघटना कामाचा वापर योग्य रितीने करण्याचे आवाहन केले. प्रकाश संसारे यांनी देवळाली नगर परिषद सतत सहकार्य देईल अशी ग्वाही दिली. गांगर्डे यांनी संघटनेने बोगस कामगारांना थारा देऊ नये, अशी भूमिका मांडली.

  कॉ. मदिना शेख यांनी महिला कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले. मेळावा समाप्ती नंतर शासनाचे वतीने बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अनुदान अवजारे खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी कामगारांचे पूर्ण अर्ज स्वीकारण्यात आले. यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल गायकवाड व भोसले यांनी कामगारांचे अर्ज भरून घेतले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी उपाध्यक्ष सुनील जग्रवाल, सचिव एकनाथ परदेशी, बाळासाहेब कराळे, शरद परदेशी, गणेश घावटे, दत्ता साठे, मीना धनवटे यांनी परिश्रम घेतले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad