728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

दीपक निंबाळकर यांना तैवानमध्ये पीएचडी


कर्जत । DNA Live24 - कर्जत तालुक्यातील दिघी येथील दीपक बापूराव निंबाळकर यांना तैवानमधील नॅशनल डाँग वा युनिव्हर्सिटीने नुकतीच डॉक्टरेट प्रदान केली. त्यांनी फिजिक्स विषयात पीएचडी मिळवली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते तैवानमध्ये संशोधन करीत आहेत. 'अ‍ॅन इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रिझोनन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ मोडीफाईड टिटॅनियम डायोक्साईड फोटोकॅटालाईट्स' हा प्रबंध सादर केला होता.

तैवानमध्ये नॅशनल डाँग वा विद्यापीठातील प्रा.डॉ. शाय चू के यांचे तसेच आमनदा लीन यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. निंबाळकर यांनी अहमदनगर महाविद्यालयातील फिजिक्स विषयात एमएस्सी केले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. बार्नबस, डॉ. एस. बी. अय्यर, प्रदीप शेळके, सय्यद यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, अशोक निंबाळकर बाजार समितीचे संचालक औदुंबर निंबाळकर, युवा नेते रोहित निंबाळकर,अनुपमा व श्रीकांत वाखारे, माधव मुळे, जी. डी. खानदेशे, प्राचार्य बी. एच. झावरे, माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे यांनी अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार अशोक निंबाळकर यांचे ते बंधू आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: दीपक निंबाळकर यांना तैवानमध्ये पीएचडी Rating: 5 Reviewed By: DNA Live24