Header Ads

 • Breaking News

  समाजऋणातून उतराई होण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी


  अहमदनगर । DNA Live24 - समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या उत्पन्नातील काही भाग वंचितांसाठी खर्च केल्यास समाजातील प्रश्‍न मिटणार असल्याची भावना अ‍ॅड. भानुदास होले यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील नेप्ती येथील होळकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जय युवा अ‍ॅकॅडमी व अनिरुध्द उपासना फाऊंडेशन (मुंबई) अंतर्गत सावेडी केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

  यावेळी उद्योजक नानासाहेब नागपुरे, सरपंच कविता पुंड, अ‍ॅड. महेश शिंदे, अंबादास पुंड, अ‍ॅड. सुनिल तोडकर, विष्णु शुक्रे, अ‍ॅड. धर्मा जपकर, धीरज ससाणे, पद्मा डुबे, नंदू जाधव आदि उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मुख्यध्यापिका छाया पादिर यांनी करुन, प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्याची माहिती दिली. अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, शिक्षणाने परिस्थिती बदलण्याची शक्ती असून, सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होणे गरजेचे आहे.

  शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार रुजल्यास सक्षमपिढी घडणार असल्याची भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. नानासाहेब नागपुरे यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. तसेच मनुष्याच्या अंगी माणुसपण असल्यास त्या श्रीमंतीला अर्थ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षित झाल्यास प्रगती होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे आभार पद्मा डुबे यांनी मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad