Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

सोमवार, ३ जुलै, २०१७

अकरा पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या


अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा पोलिस दलातील ११ पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हा बदल्यांचा आदेश काढला. काही पोलिस निरीक्षकांचा त्यांच्या पोलिस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला होता. तर काही ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे. 'सायबर सेल'ला प्रथमच पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मिळाला आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाजी नरसुडे यांची शिर्डीच्या साई मंदिर सुरक्षा विभागात बदली झाली आहे. त्यांनी जवळपास तीन वर्षे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या जागी श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांची बदली झाली आहे. तर श्रीगोंदा पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक पोवार हे आधी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात होते. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना नियुक्ती देण्यात आली आहे. चव्हाण हे आश्वी पोलिस ठाण्यात नेमणुकीला होते. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या आश्वी पोलिस ठाण्याचा पदभार ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक कटके यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या ट्रायल मॉनिटरिंग सेलमध्ये नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविणचं्रद लोखंडे यांची नेवासे पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

जिल्हा विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची सुपा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर सुपा पोलिस ठाण्याचा पदभार असलेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. पवार यांची दोन महिन्यांपूर्वीच पुणे जिल्ह्यातून नगरला बदली झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका दुहेरी हत्याकांडाच्या तपास पथकात समावेश असल्याने त्यांनी नगरचा पदभार स्वीकारलेला नाही.

सध्या नियंत्रण कक्षात असलेले पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांच्याकडे सायबर सेलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात निघोजमध्ये झालेल्या एका हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी त्यांची पारनेरहून तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. त्यांच्या रुपात सायबर सेलला प्रथमच पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी मिळाला आहे. या विभागाची जबाबदारी व गरज लक्षात घेता त्यांना नियुक्ती दिल्याचे म्हटले जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages