Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

गुरुवार, २० जुलै, २०१७

एमआयडीसीत खंडणी मागणारे ५ जण गजाआड


अहमदनगर । DNA Live24 - एमआयडीसीतील सिद्धी स्टँपिंग कंपनीत अनाधिकाराने घुसून २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी उद्योजकाने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी खंडणी व इतर कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.

मारुती शंकर कदम (वय ६०), सतीश मारुती कदम (वय २७, दोघेही रा. पिंपरी चिंचवड, पुणे), मनोज भगतसिंग शेटे (वय ३४), दिपक सखराम शेजवळ (वय ४४, दोघेही रा. नाशिक) व सुधाकर बबन अहिरे (वय ३८, रा. पवारवाडी रोड, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाच जण कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा विरोध डावलून अनाधिकाराने कंपनीत घुसले. आम्ही कामगार युनियनचे काम करतो. युनियनची परिषद होणार आहे. २० हजार रुपयांची वर्गणी द्या, असे म्हणाले.

उद्योजक सुनिल बालचंद्र कानवडे यांनी त्यांना तुमच्या युनियनशी कंपनीचा संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांचे एेकले नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या मदतीने कानवडे यांनी पाचही जणांना कंपनीत कोंडून घेतले व पोलिसांना पाचारण केले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी गेले. कानवडे यांनी आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
उद्योजकांनी घाबरु नये - कामगार संघटनांच्या वैतागाला कंटाळून एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. यापुढे एमआयडीसीतील उद्योजकांनी कोणाच्याही धमक्यांना भीक घालण्याचे कारण नाही. पोलिसांमध्ये तक्रार केल्यास खंडणीखोरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. उद्योजकांमध्ये सुरक्षिततेचे, शांततेचे वातावरण ठेवण्यास पोलिस कटीबद्ध आहेत. - विनोद चव्हाण, एपीआय, एमआयडीसी पोलिस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages