728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जंगुभाई तालिमसमोर जुगार अड्ड्यावर छापा


अहमदनगर । DNA Live24 - सिद्धीबागेजवळच्या जंगुभाई तालिमसमोर असलेल्या एका खोलीत छापा टाकून पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये प्रतिष्ठितांचा समावेश आहे. हा जुगार अड्डा भैय्या परदेशी, राजू जाधव, ननु दौंडकर व अप्पा बांगर यांच्या मालकीचा असून ते फरार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बलभिम परशुराम भगत (कापूरवाडी), कुमार रामभाऊ कचरे (भुतकरवाडी), सन्मित्र गिरीश शिंबेकर (माणिकचौक), विजय परशुराम बोरुडे (बाेरुडे मळा), दिनेश ठकण कापरे (सारसनगर), बापू चंद्रकंात शेळके (नालेगाव), बाळू रमेश कोकम (पाईपलाईन रोड), शहानवाज लियाकत शेख (कोठला), मोहसीन नाज महंमद (झेंडीगेट), कृष्णा आसाराम बोरुडे (बोरुडे मळा), समीर अब्दुल शेख (भिंगार), किशोर काशिनाथ खोलम (केडगाव), मुरलीधर विश्वनाथ कोडम (सर्जेपुरा) अशी अटक केलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलिस नाईक गणेश चव्हाण, सचिन जाधव, अभिजीत अरकल, रंगनाथ नरसाळे, मंडलिक, बारवकर, सुपारे, मिसाळ, शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जंगुभाई तालिमसमोर जुगार अड्ड्यावर छापा Rating: 5 Reviewed By: DNA Live24