Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, १ जुलै, २०१७

पोलिस व पाल्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


अहमदनगर । DNA Live24 - पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या पुढाकारातून पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांसाठी माेफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. पोलिस मुख्यालयात आठवड्यातून दोन दिवस हे वर्ग चालणार आहेत. "द विनर्स करिअर पॉईंट'चे संस्थापक संचालक डॉ. बाळासाहेब शिंदे हे अभ्यासवर्गात मार्गदर्शन करणार आहेत. २९ जूनपासून दर गुरूवारी व शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत हे मार्गदर्शन वर्ग भरणार आहेत.

पोलिस दलातील कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांना पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळावे, या हेतूने पोलिस अधीक्षक शर्मा यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला. जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना या मार्गदर्शन वर्गाचा लाभ होणार आहे. मार्गर्शक डॉ. बाळासाहेब शिंदे हे मराठी व इंग्रजी व्याकरणाचे मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक आठवड्यात दोन दिवस हा वर्ग चालणारआहे.

जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना याचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पूर्ण न नाव, व मोबाईल क्रमांक ९५ ५२ ५४५ ५७२ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शन वर्ग पोलिस मुख्यालयातील पोलिस कवायत मैदानाशेजारी असलेल्य रिक्रिएशन हॉलमध्ये भरणार आहे. इच्छुकांनी त्वरीत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages