Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, ८ जुलै, २०१७

गुरुपोर्णिमेनिमित्त चांद्यात विविध कार्यक्रम


चांदा । DNA Live24 - नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक चांद्यात दाखल झाले आहेत. साधकाश्रामाचे प्रमुख ह. भ. प. रोहिदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

येथील श्री दत्त साधकाश्रम म्हणजे महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान. भगवान श्री दत्ताचे भव्य मंदिर गावची शोभा वाढविते. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य रोहिदास महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच विविध राज्यातूनही भाविक शिष्यगण येत असतात.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी वर्षातून एकदाच गुरुवर्य रोहिदास महाराजांचे चरणस्पर्श करून दर्शन घेता येत असल्याने सर्व भक्तगण गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात.  धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात गावातून भव्य शोभायात्रेने होते. या शोभायात्रेत भाविक मोठ्या संखेने सहभागी होतात. त्यानंतर पाद्यपूजा करण्यात येते.

पाद्यपूजेनंतर ज्या भाविकांना गुरुमंत्र घ्यायचा असतो त्यांना महाराज गुरुमंत्र देतात. यावेळीच ह. भ. प पेहेरे महाराज, सुरेश अंकुलवर, नीलकंठ महाराज, दीपक भोपे, दादा गवळी, जगदीश खरात, नानासाहेब धुमाळ, आडभाई महाराज, शिवाजी दहातोंडे, बाबुराव सोनावणे, अयोध्या पंढरपूरकर आदींची प्रवचने होणार आहेत. शेवटी गुरुवर्य रोहिदास महाराजांचे जाहीर हरी कीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages