Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २५ जुलै, २०१७

नदीकाठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा


अहमदनगर । DNA Live24 - नाशिक व पुणे जिल्‍ह्यात सुरु असलेल्‍या पावसामुळे त्‍या जिल्‍हयातील बहुतांश धरणे भरलेली आहेत. धरण सुरक्षेच्‍या दृष्‍टीने धरणांतून अहमदनगर जिल्‍ह्यात वाहत असलेल्‍या गोदावरी नदीस सुमारे ५० हजार क्‍युसेक्‍स, भिमा नदीस  ६१ हजार क्‍युसेक्‍स पाण्‍याचा विसर्ग सोडलेला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्‍हयात 23 जुलैपर्यंत 255.34 मि. मि. (51.34 %) पाऊस झाला आहे. भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण भरले आहे. तर मुळा धरण (६० %) भरले आहे. आगामी काळात नगर तसेच नशिक व पुणे जिल्‍ह्यात पावसामुळे, किंवा धरणातून सोडलेल्‍या विसर्गात वाढ झाल्‍यास नगर जिल्‍हयातील नदयांच्‍या पाणी पातळीत वाढ होण्‍याची दाट शक्‍यता आहे.

त्यामुळे जिल्‍ह्यातील नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांनी केले आहे. 

हे करु नका  ↴
⇀ पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नदीपात्रापासुन दुर रहावे, सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे.
⇀ नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. 
⇀ पुर पाहण्‍यासाठी गर्दी करु नये. 
⇀ जुन्‍या /मोडकळीस आलेल्‍या इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. 
⇀ अतिवृष्‍टीमुळे भूसख्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. 
⇀ त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहण्‍या-या लोकांनी दक्षता घ्‍यावी.
⇀ वेळीच सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. 
⇀ घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.
⇀ धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी.
⇀ नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरु नये. 
⇀ अचानक नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्‍यास जिवीतास धोका उद्भवू शकतो. 
⇀ धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये.
⇀ आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा.
⇀ जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालयात फोन करावा.
⇀ दुरध्‍वनी क्र.1077 , (टोल फ्रि 0241-2323844 व 2356940) वर संपर्क साधावा. 

Post Top Ad

Your Ad Spot

Pages