728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

घरकुल वंचितांचा 28 जुलैला काळी फुगडी माेर्चा

अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा करुन, नागरिकांना नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने शुक्रवार २८ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फुगडी मार्च काढून, शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. असा निर्णय हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित घेण्यात आला. यावेळी घरकुल वंचितांनी घरकुल हमी कायदा लागू करण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या.

जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 10:30 वाजता काळी फुगडी मार्चला प्रारंभ होईल. घरकुल वंचित दंड व कपालावर काळे पट्टया बांधून फुगड्या खेळून शासनाचा निषेध नोंदवणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात काळा पैसा जागेत गुंतला असून, अनेकांच्या नांवे बेनामी संपत्ती आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याची गरज आहे. नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू केल्यास मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बेनामी संपत्ती व जागा बाहेर येईल.

मोर्चाच्या आयोजनाबद्दल आयोजित बैठकीत प्रकाश थोरात म्हणाले, पंतप्रधान आवस योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे नियोजन व निधी नसल्याने ही घोषणा फसवी ठरु पाहत आहे. या योजनेसाठी सरकारी पडिक जमीनी उपलब्ध झाल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविता येवू शकणार आहे. मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन पड असून, ही जमीन लॅण्ड बँकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्यास या योजनेला गती मिळेल.

सरकार औद्योगीकरण व रस्त्यांसाठी जमीन अधिग्रहण करते. त्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा व नगरपालिका यांनी आपल्या हद्दीतील माळरान जमीन अधिग्रहण केल्यास घरकुल वंचितांना एक गुंठा देवून, ही योजना राबविता येईल, असे अशोक सब्बन म्हणाले. यावेळी कान्हू सुंबे, ओम कदम, वैशाली नागपुरे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, शारदा भालेकर, हिराबाई ग्यानप्पा आदिंसह घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: घरकुल वंचितांचा 28 जुलैला काळी फुगडी माेर्चा Rating: 5 Reviewed By: DNA Live24