Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २ जुलै, २०१७

सारसनगरमध्ये पोलिसांची गस्त वाढवा


अहमदनगर । DNA Live24 - शहरातील सारसनगर भागात वारंवार चोरीच्या घटना वाढत असताना, रात्री परिसरात पोलिसांची गस्त वाढवून, चोरांचा बदोबस्त करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार परदेशी यांना देण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते, राहुल गाडळकर, पंकज कर्डिले, अनिल पालवे, वैभव शिंदे, किशोर शिंदे, राजू गीते, भुषण तांबे, अविनाश सांगळे, राहुल कचरे, कानिफनाथ अनारसे, उध्दव ढाकणे, गणेश साबळे, आकाश मोरे, गणेश बांगर, करण गाडे, दर्शन विधाते, श्रीकांत कचरे, अजय घोलप, विजय कोहक, सुनिल सांगळे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सारसनगर भागात दिवसंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. नुकतेच चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडून रोख रकमेचा ऐवज चोरुन नेला आहे. यामुळे परिसरातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. तसेच परिसरात घरफोड्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून तातडीने परिसरात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी व चोरांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages