728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सैनिकांचे ऋण कधीही न फेडता येणारे


अहमदनगर । DNA Live24 - अत्यंत कठिण परिस्थितीत सैनिक शत्रूंपासून सीमा रक्षणाचे कार्य करत आहेत. सैनिकांचे ऋण न फेडता येणारे असून, त्यांच्याप्रति कृतज्ञता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सैनिकांमुळेच नागरिक सुरक्षिततेचे जीवन जगत असल्याची भावना हरजितसिंग वधवा यांनी व्यक्त केली.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गुरुवारी संध्याकाळी हुतात्मा स्मारक येथे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेले वातावरण व भारत माती की जय घोषणंामध्ये पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच मेणबत्त्या प्रज्वलीत करुन शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी क्लबचे अध्यक्ष जस्मितसिंग वधवा, प्रकल्प प्रमुख हरजितसिंग वधवा, सचिव आनंद बोरा,सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, विजय कुलकर्णी, विपुल शहा, बिट्टू मनोचा, सीए किरण भंडारी, आशिष भंडारी, प्रविण साबळे, ऋषभ वाणी, सागर कुमटकर, कमलेश देवकर, सौरभ तरटे, विजय पवार, दिपक शिकारे, प्रविण शेंडगे, तुषार सागडे, विलाश भंडारे, उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत मुनोत यांनी केले. तर आभार धनंजय भंडारे यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सैनिकांचे ऋण कधीही न फेडता येणारे Rating: 5 Reviewed By: DNA Live24